वंदे भारत ट्रेननंतर रेल्वे प्रशासनाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या महिन्यात नागपूर – पुणे या गजबलेल्या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
भारतीय रेल्वेने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस चांगलीच लोकप्रिय झाली असून आता वंदे भारत स्लीपर रेल्वे येणार आहे. नागपूर ते पुणे दरम्यान ही स्लीपर सुरू करण्यात येणार आहे. सांगितले जात आहे की १५ ऑगस्ट पासून याच्या ट्रायलला सुरुवात देखील होणार आहे, सध्या या संदर्भात हालचाली वेगाने सुरू आहेत. नागपूर पुणे मार्गावर गरीब रथ अजनी पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस आणि नागपूर पुणे एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत, या संपूर्ण एक्सप्रेसला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे आता या मार्गावर स्लीपर वंदे भारत देखील सुरू होणार आहे.
पुणे शहरातून थेट ट्रेन मिळणार
प्रवाशांची नागपूर – पुणे मार्गावर चांगलीच गर्दी असल्यामुळे अनेकांना आरक्षण मिळत नाही, त्यामुळे खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागतो, आणि म्हणूनच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरातून थेट वंदे भारत ट्रेन नाही त्यामुळे मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुण्याला थांबते.
स्लीपर वंदे भारतची विशेषता काय?
स्लीपर वंदे भारतमध्ये कुशन असणारे स्लीपर बर्थ असणार असून यामध्ये दर्जेदार नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे. तसेच मोबाईल चार्जिंगसाठी देखील सुविधा आहे. सेन्सर असणारे लाईट सुद्धा असणार आहे. हे लाईट असेल तर चालू होईल अन्यथा बंद राहील.
इथे होईल कोचची निर्मिती
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) स्लीपर वंदे भारत कोचची निर्मिती करत आहे. तसेच प्रत्येक कोच मध्ये छोटी पॅन्ट्री असणार आहे.