सध्याच्या काळात प्रत्येकी घरांमध्ये नोकरी करणारे जोडपे असतात. आजकाल जरी एक पुरुष बाहेर कामाला जात असला तरी एक स्त्री देखील तितकेच खंबीर पणाने घरातील कामे करून बाहेर काम करायला जात असते ; परंतु यांच्या मागे यांच्या मुलांचे काय? म्हणजेच यांच्या या कामाचा त्यांच्या मुलांवर काय परिणाम होत असेल याबद्दल तुम्ही कधी विचार केलेला आहे का? आई – वडील त्यांच्या कामामुळे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करत असतात आणि हे तितकेच खरे आहे. बाहेरही काम आणि घरी परतल्यानंतरही सोशल मीडिया वर व्यस्त राहत असल्यामुळे आजकालचे जोडपे आपल्या मुलांना वेळ देत नसतात.
मात्र त्यांच्या या प्रकरणामुळे मुलांवर काय परिणाम होतोय. हे त्यांच्या कधी लक्षातच येत नाही. मुलांना पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे ऑटिम्ज डिसऑर्डर सारखी मोठी समस्या उद्भवत आहे. जे बाळ अगदी लहान आहे ज्यांना केवळ एकच शब्द बोलत येतो आई – वडील त्यांच्या सोबत संवाद साधत नसल्याचा हा सर्वात मोठा परिणाम होत असल्याचे बालरोग तज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
- ९ महिन्यांच्या बाळाचे नाव ऐकल्यानंतर प्रतिक्रिया न येणे.
- आनंद, दुःख, राग यावर व्यक्त न होणे.
- १२ महिन्यात सामान्य खेळ न खेळता येणे.
- तीन वर्षांपर्यंतचे मुल केवळ एकच शब्द बोलते जसे आई, बाबा आणि दूध.
- पालक दोघेही कामावर असल्याने त्यांच्याशी बोलायला कुणी राहत नाही.
- गर्भधारणा दरम्यान धोकादायक व्हायरल इन्फेक्शन, आवश्यक घटकांची कमकरता, अमली पदार्थांचे व्यसन किंवा जास्ती प्रदूषण.
- मुले मोबाईल, टिव्ही यांच्या सारख्या साहाय्याने वेळ घालवीत आहेत.