आज ३ सप्टेंबर श्रावणी मंगळवार. मंगळागौरीची सांगता आज होईल. सर्वार्थ सिद्धीचा शुभ संयोग जुळून आला असून आज कुणाच्या नशिबात यश येणार? जाणून घ्या राशिभविष्यातून.
मेष
मेष राशीचे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर ते प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता. राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढू शकतो. नोकरीमध्ये आज तुमची जागा निश्चित होऊ शकते. लव लाइफमध्ये प्रियकरासोबत खास रोमँटिक क्षण घालवा. मुलाच्या यशाने आनंद मिळेल.
वृषभ
वृषभ राशीचे ग्रह सांगतात की, तुम्हाला पालकांकडून सहकार्य मिळेल. भौतिक सुख साधनांमध्ये वाढ होऊ शकते. शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी असू शकते. पगार वाढ किंवा आर्थिक भरभराट होण्याची दाट शक्यता.
मिथुन
मिथुन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कामाच्याबाबतीत अधिक सतर्क असणे गरजेचे आहे. आर्थिक बाबींचा विचार करुन आज निर्णय घ्यावे लागतील. तुमचा खर्च वाढू शकतो.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. सरकार क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी वेगळ्याच कामात अडकतील. शत्रु आज तुमच्या प्रभाव आणि क्षमतेसमोर नतमस्तक होण्याची शक्यता.
सिंह
सिंह राशीच्या लोकांच्या कलात्मक आणि रचनात्मक क्षमतेचा विकास होईल. सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या प्रयत्नाने मोठे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता. यामुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांचा उत्साह महत्त्वाचा ठरेल. भौतिक सुख साधनांमध्ये वृद्धी होईल. भविष्यातील धन-संपत्तीच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या. शिक्षण क्षेत्रात प्रगती करा. ज्येष्ठ मंडळींनी थोडा आराम करावा आजचा दिवस थकवणारा असू शकतो.
तूळ
तूळ राशीचे लोक आज आपापल्या क्षेत्रात प्रगती करतील. लव लाइफमध्ये आज जोडीदाराची साथ मिळू शकते. आज मनातील अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करा. भावंडांना मिळून अपेक्षित यश मिळू शकते. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवा. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता.
वृश्चिक
धातूशी संबंधित काम असेल, कारखाना असेल तर नक्कीच प्रगती होण्याची शक्यता. आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवा. सुखाचे क्षण आज अनुभवाल. मोठ्या भावाचे मार्गदर्शन आज महत्त्वाचे ठरणार आहे. विचार केलेले काम पूर्ण होण्याची शक्यता.
धनू
धर्म, कर्म आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लोनसाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला आज फायदा होण्याची शक्यता. पालकांमध्ये वडिलांकडून आज लाभ होण्याची दाट शक्यता. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असू शकतो.
मकर
मकर राशीच्या लोकांचा आजचा मंगळवार खास ठरेल. रखडलेल्या सगळ्या कामात यश मिळू शकते. तुमची मेहनत खूप छान दिसणार आहे. विरोधकांकडून आणि शत्रूंकडून आज सतर्क राहा. जोडीदाराकडून छान साथ मिळण्याची शक्यता. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. शेजारच्यांसोबत वाद होण्याची शक्यता.
कुंभ
आजचा दिवस राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी महत्त्वाचा दिवस असू शकतो. वैवाहिक जीवनात मनमुठाव होण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस सुख साधनांनी भरलेला असेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी आणि सुखद आहे. लव लाइफमध्ये प्रियकरांसाठी आजचा दिवस आनंददायी असू शकतो. आज आजारी लोकांची तब्बेत सुधारण्याची शक्यता. मुलांच्या जीवनात यश, आनंद मिळेल. मान सन्मान मिळेल.