जेवणाच्या मध्ये पाणी पिणे पचन क्षमतेसाठी धोकादायक! पाणी पिण्याची योग्य वेळ काय? जाणून घ्या!

डॉक्टर जेवणाच्या मध्ये पाणी न पिण्याचा सल्ला देतात. जेवणाच्या मध्ये पाणी पिणे पचन क्षमतेसाठी धोकादायक असते. असा समज आजवर आहे. तर अनेकजण असेही म्हणतात की जेवताना पाणी प्यायल्याने शरीरात टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अनेकांना जेवणासोबत पाणी पिण्याची सवय असते. काही लोक पाणी पिल्याशिवाय जेवतच नाहीत. जेवणादरम्यान एक-दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही. पण, असे मानले जाते की जेवणादरम्यान भरपूर पाणी पिणे चांगले नाही. पाणी अन्न पचवण्यास मदत करत असले तरी अन्न खाताना पाणी प्यायल्याने विपरीत परिणाम होऊ शकतो. चला तर मग जेवताना पाणी पिणे, चांगले की वाईट? हे जाणून घेऊया.

पचनक्रिया कमकुवत होते!

जेवल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करत असल्यास पचनासंबंधित समस्यांचा धोका असतो. पाचन प्रणाली मजबूत ठेवण्यासाठी, खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानेच पाण्याचे सेवन करावे.

वजन वाढते!

अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास वजन वाढू शकते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, जेवणाच्या दोन तास आधी पाणी प्या.

मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक!

जेवणानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना धोकादायक ठरू शकते. जेवणानंतर ताबडतोब पाणी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

अल्सर!

जेवणानंतर लगेच पाण्याचे पाणी प्यायल्याने अल्सर होण्याची शक्यता असते. खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिल्यामुळे गॅस आणि आम्लतेची समस्या देखील उद्भवू शकते. आपण जे अन्न खातो ते बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठारात जाऊन पचन क्रिया होते. जठराग्नी खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नी ही पचन क्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

पाणी पिण्याची योग्य वेळ काय?

सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडते. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत.

 

टिप : वरील सर्व समस्या केवळ माहिती असून प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.