आजचा रक्षाबंधनाचा दिवस १२ राशींसाठी खास असणार आहे. ३० वर्षानंतर हा शुभ योग आला असून या पवित्र दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि शनि यांच्यात सकारात्मक बदल होणार आहे, त्यामुळे जाणून घ्या आपले आजचे राशिभविष्य.
मेष – मेष राशीच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेचा विस्तार होईल अशी शक्यता. मुलांची अभ्यासात रुची वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकते. महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असू शकतो.
वृषभ – वृषभ राशीचा गोचर स्वगृही असणार आहे. वस्तूंमधून आनंद मिळू शकतो. आईचे आरोग्य उत्तम राहिल. आरोग्याच्या समस्या कमी होण्याची संभावना. मुलांच्या तब्बेतीची काळजी घ्या.
मिथुन – मिथुन राशीचे पुरुष पुरुषार्थ दाखवतील. समाजकार्यात अतुलनीय कामगिरी कराल. बहीण-भावंडांमध्ये चांगल नात निर्माण होण्याची शक्यता. जोडीदारासाठी हा काळ शुभ राहू शकते.
कर्क – वाणी व्यवसाय क्षेत्रातील लोकांना अनुकूल दिवस आहे. परिवारात नवीन कार्य आणि पर्यायाने खर्चाचा योग आहे. वाणीवर नियंत्रण मिळवा अन्यथा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात.
सिंह – लग्नाचा विचार करणाऱ्यांसाठी हा दिवस शुभ ठरेल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल अशी शक्यता. महत्त्वकांक्षा वाढेल. नवीन कामाचा विचार करा. कलात्मक क्षेत्रातील लोकांची प्रगती होईल अशी शक्यता.
कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी गोचर सकारात्मक काळात आहे. प्रवासाचा योग येऊ शकतो. डोळ्यांच्या समस्येवर पैसे खर्च होऊ शकतात. धार्मिक क्षेत्रात विशेष लक्ष द्या.
तूळ – शेअर बाजार अथवा सट्टा बाजारात अचानक धन लाभ होण्याची शक्यता. परिश्रम महत्त्वाचे आहे त्यामुळे मेहनत करायला लाजू नका. संतान प्राप्तीचा योग आहे.
वृश्चिक – सरकारी नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हृदय रोगाशी संबंधी समस्या डोकं वर करतील अशी शक्यता.
धनू – धनू राशीच्या लोकांना भाग्याचा काळ आहे. मुलांकडून वडिलांना आनंदाची बातमी मिळू शकते. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी कामात विशेष लक्ष द्या.
मकर – मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. लघवीशी संबंधित आजार डोकं वर करू शकते. नवीन घराचा विचार करा. म्हाताऱ्या लोकांची विशेष काळजी घ्या.
कुंभ – कुंभ राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्या. जोडीदारासोबत छान वेळ घालवा. कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल.
मीन – मीन राशीच्या लोकांनी आजचा दिवस खास घालवण्याकडे विशेष लक्ष द्या. डोळ्यांच्या समस्या डोकं वर करू शकते. प्रवासामुळे थकवा जाणवेल.