पावसाळ्यात निघणाऱ्या कंटोळ्याचे आहेत इतके फायदे; शरीरासाठी अतिशय गुणकारी!

चांगल्या आरोग्यासाठी उत्तम अन्नाची शिफारस केली जाते. त्यात भाज्यांचे नाव सर्वात वर येते. भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करून आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात. कर्टुला ही भाजी देखील अशाच फायदेशीर भाज्यांपैकी एक आहे. ज्याच्या सेवनाने रोग तर बरे होतातच, पण रामबाण उपायासारखे कामही होते. या भाजीला कंटोला, कंटोळी किंवा कर्टुला म्हणतात. कर्टुलाला आयुर्वेदिक औषध असेही म्हणतात. कारल्यासारखा दिसणारा कर्टुल्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. अनेकजण याला ‘काकोरा’ या नावानेही ओळखतात. पावसाळ्यात कर्टुल्याची भाजी खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. त्याचे आरोग्याशी संबंधित इतर फायदे काय आहेत? चला जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी कर्टुला उत्तम!

कंटोळ्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया सोपी होते. यात फॅट्सही कमी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही उत्तम भाजी आहे. कंटोळ्यांमध्ये व्हिटामीन सी चे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे इम्यून सिस्टिम वाढण्यास मदत होते. शरीर संक्रमणांपासून बचाव करते.

हृदयाच्या आजारांचा धोकाही होतो कमी!

कंटोळ्यांचे नियमित सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो. ज्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. यात पोटॅशियमचे प्रमाण असते ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हाय बीपीच्या समस्या टाळण्यास मदत!

कंटोळ्यांची भाजी, हाय बीपीच्या समस्या टाळण्यास मदत करते. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर असते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. बीपी कंट्रोल करण्यास मदत होते. ब्लड वेसल्स हेल्दी राहतात. ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. म्हणूनच हाय बीपी रुग्णांसाठी कंटोळ्यांची भाजी फायदेशीर ठरते.

त्वचेच्या समस्यांसाठी गुणकारी!

कंटोळा एंटी बॅक्टेरिअल आणि एंटीफंगल गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत. इन्फेक्शन कमी होते. ज्यामुळे हंगामी आजारांपासून बचाव होतो. कंटोळे उकळवून खा नंतर याचे पाणी प्या. ज्यातून जास्तीत जास्त एक्स्टॅक्ट मिळेल.

टीप : कुठलाही उपाय करताना डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.