शिळ्या पोळीचेही अनेक फायदे; पोटाचे विकार करते कमी! जाणून घ्या कसे?

पोळी शिवाय जेवण अपूर्ण आहे. जेवणात जर पोळी नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. भारतामधील वेगवेगळ्या भागात पोळी किंवा भाकरी सगळीकडे बनवल्या जाते. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यामध्ये पोळी भाजीचा डब्बा नेला जातो. मात्र कधी कधी रात्रीच्या वेळी जेवण बनवल्यानंतर पोळी किंवा भात शिल्लक राहून जाते. तर आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात किंवा इतर पदार्थ बनवतो; परंतु अनेक लोक रात्री शिल्लक राहिलेले जेवण फेकून देतात. अनेक लोकांचा असा समज आहे की शिळी पोळी खाल्ल्यानंतर पोटात गॅस किंवा असिडिटी होते. पण हा एक गैरसमज आहे. शिळी पोळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते प्रोटीन मिळते. ते कसे हे जाणून घ्या.

शिळ्या पोळीचे फायदे काय?

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ताज्या पोळीपेक्षा शिळी पोळी अधिक फायद्याची असते. यात पोळी किती शिळी आहे, ही बाबही इथे अतिशय महत्त्वाची आहे. तज्ज्ञांच्या मते १०-१२ तासांपूर्वी तयार केलेली पोळी खाणे फायद्याचे असते. ज्यावेळी पोळी अधिक वेळासाठी ठेवली जाते तेव्हा त्यात आरएस घटक म्हणजेच रेसिस्टंस स्टार्च वाढून या घटकाचा शरीराला फायदा होतो.

पोटाचे विकार असणाऱ्यांसाठी शिळी पोळी फायद्याची!

पोटाचे विकार असणाऱ्यांसाठी शिळी पोळी फायदेशीर ठरते. यात अपचन, गॅस, पोट फुगण्याची समस्या यांवर तोडगा निघतो. त्याशिवाय पचनक्रियाही सुधरण्यास मदत होते.

शिळ्या पोळीच्या सेवनाचा मधुमेह वाल्यांनाही फायदा!

तज्ज्ञांच्या मते, शिळ्या पोळीच्या सेवनाचा मधुमेहींना ही फायदा होतो. या व्याधीने ग्रासलेल्यांसाठी रेजिस्टंस स्टार्च अतिशय महत्त्वाचा घटक असून तो या शिळ्या पोळीमध्ये आढळतो. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते.

 

टीप : ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.