आज ४ ऑगस्ट रविवार आषाढी अमावस्यासह रविपुष्य योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्याकरिता आपला आजचा दिवस आणि आपल्या राशित नेमकं काय हे जाणून घ्या.
मेष : आजच्या दिवशी काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येण्याची शक्यता. लहान गोष्टीतून सकारात्मक, फायद्याची गोष्ट घडू शकते.
वृषभ : आजच्या दिवशी विचार करत असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे.
मिथुन : आजच्या दिवशी नोकरीत एखादा सन्मान मिळेल. तसेच, व्यापार आणि नोकरीत फायदा होण्याची शक्यता. गुंतवणुकीत फायदा होण्याची शक्यता.
कर्क : आजच्या दिवशी नाती आणि नातेवाईकांना जपा. काही प्रश्न पुढे उपस्थित होऊ शकतील. अधिक जबाबदारीचे काम देखील मिळू शकते.
सिंह : आजच्या दिवशी इतरांच्या मदतीने तुम्हाला आनंद मिळू शकतो. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या : आजच्या दिवशी काही टेन्शन कमी होऊ शकतात. जवळच्या लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
तूळ : आज तुम्ही तुमचे मन दुसऱ्या कामांमध्ये अधिक गुंतवा. वेळेत अपूऱ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता.
वृश्चिक : आजच्या दिवशी अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग असू शकतो.
धनु : आजच्या दिवशी करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता. माहिती मिळवण्यासाठी नवे मार्ग अंमलात आणा.
मकर : आजच्या दिवशी शत्रूंवर तुमचे वर्चस्व असू शकते. पूर्ण एकाग्रताने काम करा. चांगल्या बातमीची प्रतिक्षा करा.
कुंभ : आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होऊ शकते. नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने प्रगती करा.
मीन : आजच्या दिवशी गुंतवणुकीमुळे फायदा होण्याची शक्यता. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल, तर धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.