आज विजांच्या कडकडाहटसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस ; या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्र : – राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अशातच, आजही हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणीही पावसाचा जोर वाढला आहे; परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने उसंती घेतल्यामुळे शेतीकामात वेग आल्याचे दिसून आले. मात्र आज पुन्हा जोरदार पावसाचे संकेत मिळाले असून मुंबई, कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात काहीसा पाऊस येईल, असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. यामध्ये, मराठवाडा आणि अन्य काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाहटसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे आणि बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगावमध्ये रिमझिम पाऊसाची शक्यता. मात्र, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या राज्यात मुसळधार पाऊस आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

 

काही ठिकाणी पाऊसामुळे धरणसाखळी परिसरात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे, काही ठिकाणच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आव्हान देखील करण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असेदेखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.