जियो कंपनीने रिचार्जचे दर वाढवल्यानंतर प्रत्येकी जियो युजर्सला फटका बसलेला असून, अनेकांनी आपले सिम कार्ड बदलण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. अशातच आता एअरटेल (Airtel) ने खास प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची वैधता चक्क वर्षभरासाठी (365 day) असणार असल्याचे समजते. माहितीनुसार, या प्लॅनची किंमत केवळ १९९९ इतकी आहे.
एकीकडे, एअरटेल ही आपल्या देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी आहे, आणि अनेक लोक एअरटेल या सिम कार्डचा वापरही करतात. म्हणूनच आता एअरटेल या कंपनीने त्यांच्या युजर्स करिता या प्लॅनची घोषणा केलेली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांसाठी १९९९ चा रिचार्ज करता येईल. तसेच यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० मेसेज (daily 100 SMS) आणि २४ जिबी डाटा (24 GB data) मिळणार आहे. काही ग्राहकांना अगदी कमी डाटा हवा असतो, किंवा त्यांना केवळ कॉलिंग करिता आणि साधारण मेसेज करिता जर प्लॅन हवा असेल त्यांच्या करिता हा एअरटेल प्लॅन नक्कीच उपयोगी ठरेल. युजर्सला सर्कलमध्ये तीन महिन्याच्या फ्री एक्सेसही मिळतो, यासोबतच युजर विंग आणि विंग म्यूजिकवर मोफत हॅलो ट्यूनची सुविधा देखील मिळते. अशातच आता या एअरटेल प्लॅनमुळे सर्वत्र जियोचा छंद सोडून लोकांची पसंती एअरटेल कडे वळते का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.