आजचा दिवस फार महत्त्वाचा ; कुणाच्या राशीत नेमकं काय? जाणून घ्या

३० जुलै २०२४, मंगळवारचा दिवस ग्रहांच्या हालचाली पाहता फार महत्त्वाचा आहे. आज कृतिका नक्षत्र जागृत असून, कृष्ण पक्षातील दशमी आहे. त्यामुळे तुमचा आजचा दिवस नेमका कसा असेल? कुणासाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल? हे बघण्यासाठी जाणून घ्या आजचे राशिभविष्य.

मेष:- जुनी येणी वसूल होण्याची शक्यता, तसेच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद मिळाल्याचे बघता दिवसभर मन प्रसन्न राहू शकते. यासोबतच घरगुती कामे मनासारखे पार पडून नेहमीप्रमाणे पालकांच्या शुभ आशीर्वादाची साथ लाभेल.

वृषभ:- आज कमी बोलण्यात . जास्ती समजदारी दिसून येईल, याने आपल्या स्वभावतून स्पष्टता जाणवेल. काळजी करण्यासारखे विषय सोडून निर्भिरपणे कार्यरत रहा.

मिथुन:- आज पैशांचा वापर केवळ गरजेपुरता करावा आणि मानसिक स्थैर्य बाळगा. कौटुंबिक चर्चा हिताची ठरेल, अशी शक्यता तसेच नियमित व्यवहारात खंड पडू देऊ नका.

कर्क :- कुठल्याही नात्यातील कळवटपणा टाळून गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर या. तसेच, मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. भौतिक सुखावर खर्च करण्याचा अंदाज.

सिंह:- आज कुठल्याही कामात बक्षीस मिळण्याची शक्यता. कामे समाधानकारक रित्या पार पडतील. नवीन योजनांवर काम चालू करण्यास उत्तम दिवस. तसेच, आत्मविश्वास वाढीस लागण्याची शक्यता.

कन्या:- घरात धार्मिक कार्यासंबंधी बोलणी होईल असा अंदाज. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, किंवा थकवा जाणवू शकतो. तसेच, दिवस अनुकूल असून, ज्येष्ठ बंधुंचे सहकार्य लाभण्याची शक्यता.

तूळ:- आपलेच विचार समजून जोडीदाराचा विचार जाणून घ्या आणि नंतरच प्रतिक्रिया द्या. विद्यार्थ्यांमध्ये नवीन गोष्टी शिकण्यास उत्साह दिसून येईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभले असता, मुलांकडून आनंद वार्ता मिळण्याची शक्यता.

वृश्चिक :- संपर्कातील लोकांचे सहकार्य लाभण्याची शक्यता. मन अगदी आनंदित असून वैवाहिक जीवन सुखमय राहण्याची शक्यता. आज एखादी नवीन ओळखही मिळण्याची शक्यता.

धनू:- मनाची चंचलता गोठ्यात ठेवा. कदाचित तुमचा सल्ला विचारण्यात येऊ शकतो. व्यायामाची आवड निर्माण होण्याची शक्यता. तसेच, तुमच्या ज्ञानात भर पडेल, त्यामुळे गुंतवणूक करताना जरा विचार करा.

मकर:- चांगल्या विचारात रमलेले असताना मुलांशी मन मोकळ्या पणाने चर्चा होण्याची शक्यता. आजचा दिवस खिलाडु वृत्तीने घालवा. घरातील वातावरण राहण्यासाठी कुठलाही विरोध करू नका.

कुंभ:- घरातील कामे आवडीने करा. कौटुंबिक गोष्टींत अधिक वेळ घालवा. हातातील अधिकारात वाढ होण्याची शक्यता. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, भागीदारीत समाधानी राहाल याचा अंदाज.

मीन:- काही दिवसांपासून रखडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होऊन जबाबदारी वाढण्याची शक्यता. तसेच, निसर्ग-सौंदर्यात रमून जा आणि संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहा.