निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प जाहीर ; महाराष्ट्राला नेमके काय मिळाले?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत काल अर्थसंकल्प जाहीर केला, NDA सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प जाहीर झाला असून यामध्ये सर्वसामान्यांपासून ते करदाते तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

या अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाला नक्कीच चालना मिळणार असल्याचे देखील यावेळी सीतारामन म्हणाल्या. या अर्थसंकल्पात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले तसेच युवकांसाठीही यामध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, मात्र महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून नेमके काय मिळाले हे देखील तितकेच महत्त्वाचे असून याबद्दलची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, केंद्रीय अर्थसंकल्प हा भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प असून यामध्ये गरीब, युवक तसेच शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असे डोळ्यासमोर ठेऊनच हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे . सर्वच क्षेत्रात रोजगार निर्माण होतील आणि याचा देशाच्या गुंतवणुकीला नक्कीच मोठा फायदा देखील होईल, मलासुद्धा या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी फायदा दिसून आलेला आहे असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले? देवेंद्र फडणवीस यांनी वाचली यादी.

– विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी

– महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी

– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी

– पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी

– महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी

– MUTP-3 : 908 कोटी

– मुंबई मेट्रो: 1087 कोटी

– दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी

– MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी

– नागपूर मेट्रो: 683 कोटी

– नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी

– पुणे मेट्रो: 814 कोटी

– मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी