नागपूर मध्यवर्ती कारागृहात दिवाळी पहाट कार्यक्रम, बंद्यांनी गायली गाणी

नागपूर मध्यवर्ती कारागृहात दिवाळी पाडवा संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील द हामोर्नी इव्हेंट्स, न्यू नंदनवन या संचानं आपल्या संगीत कलेच्या माध्यमातून बंदींना संगीताचा आस्वाद करून दिला. तर नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी दिपावली सनानिमित्त शुभेच्छा देऊन सर्व बंद्यांच्या आयुष्यात दिवाळीची सोनेरी पहाट यावी आणि कारागृहाबाहेर जाऊन कुटुंबासोबत नविन आयुष्याची सुरुवात करावी, यासाठी सदिच्छा देखील दिल्या.

प्रशांत बुरुडे (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संकल्पनेतून व श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पुर्व विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरीता दिपावली सनानिमित्त द हार्मोनी इव्हेंट्स, न्यू नंदनवन, नागपूर च्या माध्यमातून दिवाळी पाडवा संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरीता वैभव आगे, अधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृह, श्रीमती दिपा आगे, अति.अधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृह, श्रीधर काळे, उपअधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृह, आनंद पानसरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी (प्रशासन), एन.एस.अहिरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, मनोहर व्हि. भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी व विजय आर. सोळंके, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ तसेच कारागृह कर्मचारी व बंदी उपस्थित होते.

दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आस्वाद घेताना बंदी
दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आस्वाद घेताना बंदी

दिवाळी पहाट कार्यक्रमाकरीता उपस्थित बंदी बांधवांना द हार्मोनी इव्हेंट्स, न्यू नंदनवन, नागपूर चे संचालक राजेश समर्थ, इंडियन आयडल फेम श्रीमती जयश्री भावे, सुप्रसिध्द गायक श्री. दिनेश कुमार, लोकप्रिय गायिका श्रीमती स्वाती खडसे या गायकांनी गणेशवंदन, देश भक्तीपर व इतर मधूर गीते सादर करुन बंद्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच संपुर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्रीमती श्वेता शेलगांवकर यांनी केले. तसेच उत्स्फुर्तपणे काही बंद्यांनी हिंदी व मराठी गीतांचे गायन करुन कार्यक्रमाची रंगत वाढविली. दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा सण आहे. त्याच हेतूने बंदी हा देखील एक समाजाचा घटक आहे. त्यामूळे कारागृहातील बंद्यांच्या जिवनात दिपावलीच्या सणानिमित्ताने आनंद निर्माण करण्यासाठी सदर दिवाळी पाडवा संगीत रजनी कार्यक्रमाचे कारागृह प्रशानाकडून आयोजन करण्यात आले होते.