Horoscope today 17 October 2024: आज शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून सर्वार्थ सिद्धी योग; जाणून घ्या कुणाच्या नशिबात आज काय? वाचा गुरुवारचे राशिभविष्य!

आज १७ ऑक्टोबर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून या दिवशी हर्ष योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असणार?

मेष – कोणतेही काम जलदरित्या होईल. मनासारखी कार्ये होऊ शकतील. आरोग्य प्रतिकार शक्ति उत्तम. मन प्रसन्न वाटेल. आज नविन निर्णय घ्या. विशेष ऊर्जा मिळेल. प्रवास देखील छान होण्याची शक्यता.

वृषभ – धनलाभ होण्याची शक्यता. आपल्या बोलण्यानुसार प्रगती निश्चित होईल. गोड वाणी तर उत्तम लाभ. आपल्या शब्दांनी अनेकांची मने जिंका. कुटुंबाकडून सुख प्राप्ती होण्याची शक्यता. त्याचबरोबर आनंद साजरा करा.

मिथून – भावंडांशी संपर्क होईल. चांगल्या बातम्या मिळू शकतील. काहितरी नवीन पराक्रम करण्याची इच्छा होऊ शकते. आज शेजारी लोकांशी संवाद साधाल. द्विधा मनस्थितीतून मार्ग मिळेल.

कर्क – घरासंबंधीत कार्ये जलद गतीने होताना दिसतील. घरामधे आनंदाचे वातावरण दिसेल. कामामध्ये चांगला फायदा होण्याची शक्यता.

सिंह – आजचा अभ्यास नियमित पूर्ण होईल. कमी कष्टात कार्ये संपन्न होतील. मार्केट क्षेत्रात यशलाभ. संतती सुख मिळेल. प्रेमात यश मिळण्याची शक्यता.

कन्या – शत्रूंपासून सावधान राहावे कदाचित फसवणुक होऊ शकते. सावधरित्या प्रवास करावा. लक्षपुर्वक कार्ये करावीत कोणीतरी बाधा आणण्याचा प्रयत्न करेल असे दिसते. अध्यात्मात प्रगती करण्याचा प्रयत्न करावा.

तूळ – आपल्या राशीत रवीने प्रवेश केला आहे जिथे रवी निर्बली असतो. इथे रवीच्या भावानुसार फले मिळतील. शक्यतो नोकरीमध्ये किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्चिक – वरिष्ठांकडून किंवा पत्नीकडून धनलाभ होऊ शकतो. वाहने सावकाश चालवावीत अपघाताची लक्षणे दिसतात. एकांत प्रिय वाटेल. प्रवास देखील एकटेच करा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्याल.

धनु – प्रवासासाठी उत्तम दिवस. प्रवासी कामे व्यवस्थित पार पडतील. यात्रा इत्यादी सुखरूप होतील. अध्यात्मातील प्रगती वाढण्याची शक्यता. उच्च शिक्षणासाठी केलेले श्रम फलदायी ठरेल.

कुंभ – व्यवसायात थोडा विलंबाने लाभ होईल. केलेल्या कामाचे फल अपेक्षित वाटेल परंतु असे नसून ते धैर्याने उत्तम प्रकारे मिळणार आहे. चिंता नसावी तुमच्या वाट्याचे तुम्हाला निश्चित मिळणार.

मीन – बारावा चंद्र अधिक खर्च दर्शवितो तो पण अनपेक्षित खर्च. त्यामुळे खरेदीवर नियंत्रण ठेवा. वेळेवर लक्षात येणार नाही परंतु मग वाटू शकते की आवश्यकता नसताना देखील अधिक खर्च होतोय. दूरचा प्रवास टाळावा.