Horoscope today 16 October 2024: आज बुधवार शरद पौर्णिमा असून सर्वार्थ सिद्धी योग; त्यामुळे कुठल्या राशींचे नशिब चमकणार? वाचा राशिभविष्य!

आज १६ ऑक्टोबर बुधवार शरद पौर्णिमा असून रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, शश राजयोग तसेच गुरू आणि सूर्याचा नववा आणि पाचवा योग, चंद्र आणि मंगळाचा केंद्रयोग. या सर्वांसोबतच ध्रुव योगही तयार होत आहे. त्यामुळे कुठल्या राशींचे नशिब चमकणार आहे? चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असणार?

मेष – प्रवास होण्याची शक्यता. पती/पत्नी कडून विशेष लाभ. काही ठिकाणी मानसिक त्रास संभवेल. एकटेपणा वाटू शकतो. वाहने सावकाश चालवावी. मन अस्वस्थ न व्हावे यासाठी अध्यात्मिकता वाढवावी.

वृषभ – गाठीभेटी घ्या. एखादी ट्रीप काढा. उत्तम प्रवास होईल. विद्वान लोक भेटू शकतील. छान मार्गदर्शन मिळेल. लेखन वाचन इत्यादी शिक्षणासंदर्भात विशेष लाभ दिसतो आहे. अभ्यासात मन लागेल.

मिथून – थकवा जाणवू शकतो. भरपूर कामे होतील. घरगुती व्यवसाय छान होईल. अनेक कामे मिळू शकतील. प्रयत्नांत लाभ दिसतो. घरातील लोकांकडून थोडक्यात मानसिक त्रास होण्याची शंका आहे परंतु आपण दुर्लक्ष करावे जेणेकरून डोकं शांत राहील.

कर्क – संतती सुख लाभेल. स्नेही लोकांची अथवा मित्रांची भेट होऊ शकते. तुम्ही ज्यांना प्रिय मानता अश्या लोकांसाठी खर्च होईल. फसव्या लोकांपासून सावधान राहावे. पैसे गुंतविण्यास हरकत नाही.

सिंह – भागीदारीत पैसै गुंतवू नका व्यय होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद किंवा पत्नी/पतीकडून मानसिक त्रास संभवू शकतो. अधिक किंवा अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.

कन्या – आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता. कष्ट थोडे कमी होईल. जोडीदाराकडून मदत अथवा लाभ होईल. जलद कार्ये होईल. काही ठिकाणी थकवा जाणवू शकतो. आळशीपणा करू नये अन्यथा महत्वपूर्ण कार्ये राहून पुढे अडचण येऊ शकते.

तूळ – वाहने लक्षपूर्वक चालवावीत. कुटूंबातील लोकांसमोर चिडचिड किंवा संभ्रमित व्हाल. एकटेपणा जाणवू शकतो. जोडीदारासोबत वादविवाद होण्याची शक्यता दिसते. शक्यतो मौनच राहावे.

वृश्चिक – पत्नी सोबत प्रवासाचा किंवा जवळच्या व्यक्तींबरोबर प्रवास होईल. प्रवासात विशेष सुख मिळू शकते. मनावरील ताण थोडा कमी होण्याची शक्यता. यात्रेस किंवा कुलदेवतेच्या दर्शनास जावे. भावंडांकडून लाभ होण्याची शक्यता.

धनु – घरगुती कामे पूर्ण होतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात विशेष लाभ मिळण्याची शक्यता. नोकरीसाठी कॉल अथवा अपेक्षित बातमी भेटू शकते. भागीदारीत यश मिळेल.

मकर – शिक्षणासाठी केलेले परिश्रम फलास येईल. अभ्यास छान होईल. मार्केट इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केल्यास लाभ होऊ शकतो. मित्र मंडळी भेटतील. स्नेही व्यक्तींबरोबर उत्सव साजरा कराल.

कुंभ – आरोग्य सांभाळावे, नैसर्गिक त्रास होण्याची संभावना आहे. दूषित पाण्यापासून सावध राहावे तसेच बाहेरील खाद्य पदार्थ टाळावेत. अशक्तपणा किंवा काही ठिकाणी अस्वस्थ मन होऊ शकते.

मीन – स्नेही व्यक्तींचा सहवास लाभू शकतो. सुखद भाव असेल. प्रसन्नता वाटेल. चांगली कामे होतील. विशेष ऊर्जा जाणवेल, गरजू व्यक्तींची मदत करा. त्यातून आनंद प्राप्त होईल. दूरचे प्रवास टाळा.