Horoscope today 15 October 2024: आज सर्वार्थ सिद्धी योग असून, पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग; पाहा मेष ते मीन राशीला मंगळवार कसा जाणार?

आज १५ ऑक्टोबर मंगळवार, असून आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून आहे. या तिथीला भौम प्रदोष व्रत केले जाणार आहे. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसांचे महत्त्व वाढले आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असणार?

मेष – मार्केटिंग, सोशल मीडिया इत्यादी क्षेत्रात यश अथवा सन्मान मिळण्याची शक्यता अर्थात त्यातून काही आनंद प्राप्ती होईल. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. त्यातून लाभ थोडा उशिरा किंवा थोड्या अधिक कष्टाने मिळेल परंतु उत्तम मिळेल.

वृषभ – संततीचा सहवास मिळेल, परंतु तो सुखदायी असेलच असे नाही. काही विशेष हट्ट देखील असू शकतो जे पुर्ण करणे शक्य होणार नाही किंवा कदाचित तूम्ही पूर्ण देखील कराल. थोडीशी चिंता भासेल,अध्यात्मिक अभ्यास केल्यास मार्ग मिळेल.

मिथून – द्विधा मनस्थिती सामना करावा लागू शकतो. निर्णय घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शक शोधा. वाहने सावकाश चालवा, जेवढा लाभ त्यापेक्षा अधिक खर्च होईल असे दिसते.

कर्क – विशेष करून वाहने नियमित चालवावीत,आरोग्याच्या तक्रारी संभवतील. आवडीच्या गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून एकटेपणा दूर होण्यास मदत होईल. दूरचा प्रवास टाळावा.

सिंह – अधिक कष्टांत कमी लाभ होईल, परंतु काहीतरी नवीन विषय शिकण्यास मिळेल अर्थात नवीन अनुभव जीवनात मिळू शकते. ज्यामुळे पुढे ते कमी येईल. या दिवसात अपघाताचे प्रमाण अधिक आहे वाहने सावकाश चालवावीत.

कन्या – मनाविरूद्ध घटना घडण्याची शक्यता. अपेक्षित लाभ विलंबाने होईल. अशक्तपणा जाणवेल, ताणतणाव वाढल्यासारखा वाटेल, विश्रांतीची आवश्यकता भासेल, विश्रांती घेऊन नवीन प्रवासाची सुरुवात करा मग विशेष लाभ होण्याची संभावना आहे.

तूळ – कोणतेही काम शांततापूर्वकच होईल, गडबडीत आलेले हातातले काम निसटून जाण्याची शंका आहे त्यामुळे धैर्याने कार्य करा.

वृश्चिक – अधिकारात वाढ होऊ शकते. कार्ये सफल होईल. महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करा. शिक्षणासाठी केलेले परिश्रम फलप्रद होतील. व्यवसायात छान नफा होऊ शकतो.

धनु – मित्रांची भेट होऊ शकते. फसवणुक होण्याची संभावना आहे सावध राहावे. करमणुकीत वेळ जाईल. मिळालेला वेळ योग्य ठिकाणी घालवा. जनमानसात जा ज्यामुळे तुमच्या कार्याची मार्केटिंग होऊन तुम्हाला लवकर लाभ मिळेल.

मकर – अधिक घेतलेले श्रम वाया जाऊ शकते. लक्षपुर्वक कार्ये करा. कामात मन लागणार नाही, मानसिक स्थिती थोडी ठीक नसेल,थोडी चलबिचल असेल, कदाचित चिडचिड पण होऊ शकते शक्यतो मौन धारण करावे.

कुंभ – चंचल मानसिकता, काहितरी नविन करावेसे वाटेल, आरोग्य प्रतिकार शक्ति उत्तम जाणवेल. नवीन उर्जा प्राप्त होऊ शकते. जलद गतीने कार्ये संपन्न होतील. जोडीदाराकडून धनलाभ होऊ शकेल. वाहने मात्र सावकाश चालवा.

मीन – प्रवास छान होईल. कुटुंबासह आनंद साजरा करा. खर्च देखील नियमित होईल. अध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष द्या. तीर्थाटन, कुलदेवतेची यात्रा इत्यादी करण्याचा यत्न करावा ज्यामुळे मनोवांछित कार्ये सफल होतील.