आज ८ ऑक्टोबर मंगळवार असून नवरात्रीची सहावी माळ आहे. त्यामुळे कात्यायनी देवीची सर्वांवर कृपा राहिल. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असणार?
मेष – आपण केलेल्या कामाचे फल अन्य कोणास मिळू शकते. प्रेमप्रकरणात फसवणुक होण्याची शक्यता दिसते. संशयित घटना घडतील, मुलांसोबत थोडक्यात वादविवाद होऊ शकतात. नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी जागरूक राहावे.
वृषभ – केलेल्या कामाचे उत्तम फल मिळेल. स्नेही मित्रांची भेट होऊ शकते. घरातील लोकांसाठी छान खरेदी करा. व्यवसाय इ क्षेत्रात चांगला फायदा होण्याची शक्यता. काही ठिकाणी अनपेक्षित खर्च होऊ शकतो.
मिथून – दूरचे प्रवास टाळावेत. दवाखाना होण्याची शक्यता दिसते. लक्षपूर्वक कार्य करावेत गडबडीत कदाचित नुकसान होऊ शकते. अन्य कोणतेही अनपेक्षित विचार डोक्यात आणू नयेत. अन्यथा जेवढे हातात आहे तेवढे देखील गमावून बसाल.
कर्क – छान दिवस असेल. आपल्या संततिसह आनंद साजरा करा. प्रवास होईल, आरोग्य सुखद आहे तरीही काळजी घ्यावी, आपण नाजूक मनाचे आहात त्यामुळे लगेच कोणावर विश्वास ठेवू नका. कोणीतरी या नाजुकपणाचा फायदा घेऊ शकतो.
सिंह – खर्च थोडा अधिक होईल परंतु चिंता नसावी जवळच्या लोकांसाठी तथा अपेक्षित कर्यासाठीच खर्च होईल. धनलाभासाठी थोडेफार कष्ट करावे लागू शकते. परंतु प्रयत्नाने चांगला लाभ दिसतो. आपले यत्न सुरू ठेवावेत.
कन्या – धनलाभासाठी अनेक प्रयत्न करूनही नफा मात्र होतच नाही असे वाटून घेऊ नका. लवकरच दिवस येतील मात्र महत्त्वाकांक्षा सोडू नका. आपण आपण आपल्या बुद्धीचातुर्याने उत्तम लाभ करून घ्याल.
तूळ – उत्तम गृहासौख्य लाभेल. कुटुंबातील लोकांसह आनंद साजरा करा. घरासाठी प्रयत्न करत असाल तर उत्तम मार्गदर्शन मिळेल. आईची सेवा करा निश्चितच सुखद अनुभव येईल. घर किंवा जमिनी संदर्भातील कामे होऊ शकतील.
वृश्चिक – प्रेमप्रकरणात थोडक्यात मानसिक त्रास संभवेल आपलीच लोकं आपली नाहीत की काय? असा भाव निर्माण होऊन शकतो तरीही अशा विचारांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात व्यस्त राहावे. प्रकृतीचे कामच आहे परिक्षण करणे.
धनु – धनहानी अर्थात नाही तिथे खर्च होण्याची शक्यता दिसते. त्यामुळे अश्या ठिकाणी सावधानता आवश्यक आहे. विशेष करून कुटुंबातील लोकांचा आग्रह असू शकतो. तुम्ही बुध्दीमान आहे कुठे काय कसा निर्णय घ्यायचा हे आपण जाणता त्यामुळे योग्य तो निर्णय आपण घ्याल.
मकर – तुम्ही व्यवहारीक बुध्दीचे आहात परंतु तसेच सांसारिक देखील आहात, काही गोष्टी पत्नीचे देखील ऐकून घ्यावे जेणेकरून आपण टेन्शन फ्री राहाल. अन्यथा अनपेक्षित चर्चेतून केवळ मानसिक त्रास होण्याची संभावना आहे.
कुंभ – अपेक्षित सुखांचा लाभ होण्याची शक्यता. विशेष धनलाभ दिसतो. पुरस्कार मिळण्याचा दिवस आहे. काही ठिकाणी जवाबदारी वाढू शकते. अर्थात मोठेपणा मिळण्याची शक्यता आहे. दूरचा प्रवास होऊ शकतो. आजचा दिवस छान असेल.
मीन – आज उच्च शिक्षणासंदर्भात किंवा दूरच्या प्रवासासंदर्भात निर्णय घेऊ नये. कदाचित अनपेक्षित अनुभव येऊ शकतो. प्रेमप्रकरण तथा मार्केट इत्यादीचा विचार करू नये यामधे नुकसान किंवा फसवणूक होण्याची दाट शक्यता दिसते. प्रवासासाठी दिवस ठीक आहे.