आज ६ ऑक्टोबर रविवार असून चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी प्रीति योग, रवि योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार झाला आहे, त्यामुळे जाणून घ्या मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी रविवारचा दिवस कसा असणार?
मेष
दवाखाना होण्याची शक्यता दिसते त्यामुळे दूरचे प्रवास टाळा, व्यर्थ खर्च होऊ शकतो. मनाविरुद्ध घटना घडू शकतील सावधान असावे. साधारण नोकरी ठिकाणी अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता दिसते त्यामुळे आज मौन हेच तुमचे शस्त्र आहे.
वृषभ
आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे परंतु प्रतिकार शक्ती असल्याने कोणतेही कार्य अडणार नाही. जे नियमित कार्य आहेत ते निश्चित पूर्ण होईल. काहीतरी नवीन शिकण्यास मिळेल. नोकरीच्या ठिकाणी काही विशेष घटना घडू शकतील.
मिथून
आज प्रयत्नाने उत्तम लाभ दिसतो. आपल्या उत्तम वाणीचा चांगल्याप्रकारे उपयोग करून व्यवहार कराल तर व्यवसायात छान नफा होईल. दूरचा प्रवास टाळावा तसेच दुहेरी विचारात मन गोंधळू शकते.
कर्क
आज आपल्याला थोडे अधिक काम करावे लागणार, तरीही शारीरिक त्रास होणार नाही याची दक्षता मात्र घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी विशेष लाभ होऊ शकतो. शत्रूंपासून सावधान राहावे. आरोग्य सांभाळा.
सिंह
केलेल्या कार्याचे परिणाम उशिरा मिळेल. पेशन्स ठेवले असता निश्चित लाभ आहे. परंतु घरातील कामे देखील वाढतील. शांतपणे निर्णय घेतले असता सर्व काही व्यवस्थित होईल, चिडचिड होईल अश्या घटना घडण्याची शक्यता आहे.
कन्या
शेअर मार्केट इत्यादीतून नुकसान संभवेल त्यामुळे शक्यतो पैसे गुंतवू नका,जवळच्या लोकांकडून मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. गडबडीत कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.
तूळ
नोकर किंवा हाताखाली काम करण्यार्यांपासून सावध राहावे,फसवणुक होण्याची शक्यता आहे. खरेदी तथा विक्री यासंदर्भात देखील सावधानता असावी तसेच आरोग्य सांभाळावे. वातावरणानुसार आजार होऊ शकतो.
वृश्चिक
पार्टनरशिप मधून लाभ होऊ शकतो. जोडीदाराकडून काहीतरी फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांसमवेत आनंद साजरा करा. आरोग्य सांभाळावे हॉस्पिटल खर्च होऊ शकतो.
धनु
आज एकटेपणा वाटू शकेल. जवळच्या लोकांशी वादविवाद होण्याची शक्यता दिसते. वाहने सावकाश चालवा. कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित घटना घडतील ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. शक्यतो अश्या गोष्टींकडे दुर्लक्षच करा.
मकर
परिवारासह दूरचा व छान असा प्रवास होईल. उत्तम सांसारिक सुख मिळेल, मातेकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. देवकार्य तथा कुलदेवता यांची आराधना किंवा यात्रा करण्याचा विचार येईल, अध्यत्मिक कार्ये घडतील.
कुंभ
अगदी निवांत कामे होतील. आज शांत मनाने सर्व निर्णय घ्याल. विशेष काहीतरी शिकण्यास मिळेल. वडिलांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. व्यवसायात तथा नोकरीसंदर्भात योग्य तो लाभ होईल.
मीन
मित्रांकडून फसवणुक होण्याची शक्यता आहे सावधानता बाळगल्यास उत्तम. नोकरीच्या ठिकाणी विशेष लाभ होऊ शकतो. व्यवसाय संदर्भात महत्त्वाकांक्षा कमी पडेल ज्यामुळे नफा थोडा कमी होण्याची संभावना आहे.