आज ३ ऑक्टोबर गुरुवार असून शारदीय नवरात्री आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. आजपासून दुर्गा देवीच्या ९ रुपांची पूजा केली जाईल. चंद्र कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ऐंद्र योग, बुधादित्य योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यामुळे कुठल्या राशींवर दुर्गा देवीची कृपा राहिल? जाणून घेऊया राशिभविष्यतून.
मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. आर्थिक लाभाचे योग येऊ शकतात. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासात वाढ होईल. लोकांनी चर्चा करताना सावध राहा. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे.
वृषभ राशी
आज एखाद्या गोष्टीमुळे कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे मन अशांत राहील. वडिलांचे सहकार्य लाभेल. खर्चात वाढ होऊ शकते. काही दिवसांपर्यंत जीवनात चढ-उतार होण्याची शक्यता.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. आरोग्याबाबत सतर्क राहा. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. नोकरीसाठी परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याची संभावना आहे.
कर्क राशी
या राशीच्या व्यक्तींना आज आनंदाची बातमी मिळू शकते. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तींची साथ मिळू शकते. नवीन काम सुरु करण्यासाठी व्यापाऱ्यांनी मेहनत घ्या.
सिंह राशी
आज घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या जुन्या मित्राचे घरी आगमन होऊ शकते. कौटुंबीक जीवन सुखी राहील. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात.
कन्या राशी
आज तुम्हाला खूप महत्त्वाचा निर्णय रोखण्याची आवश्यकता आहे. नोकरीत मोठे बदल होऊ शकतात. कार्यक्षेत्रातही बदल होऊ शकतात. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
तुळ राशी
आज तुमचे एखादे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ज्यामुळे मन प्रसन्न होईल. व्यापारांसाठी चांगला दिवस असणार आहे. कामकाजात प्रगती होईल. आर्थिक वाढ होण्याची शक्यता.
वृश्चिक राशी
शिक्षणाच्या क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. नोकरीत अधिकाऱ्यांसोबत तालमेल ठेवा. कामकाजात तुमची प्रगती होऊ शकते. परदेशात जाण्याचा योग आहे.
धनु राशी
आज तुमच्या आत्मविश्वासात कमी राहणार नाही. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक गोष्टी चांगल्या राहतील.
मकर राशी
कार्यालयात तुम्हाला नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. नोकरी-कार्यक्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता. कार्यालयात जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याबाबत काळजी घ्या.
कुंभ राशी
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक गोष्टींमध्ये वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळू शकते. खर्चात वाढ होण्याची शक्यता. आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.
मीन राशी
मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आर्थिक गोष्टींमध्ये प्रगती होईल. कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीत यश मिळू शकते. व्यापारांसाठी चांगला दिवस आहे.