अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजगाव सुर्जी तालुक्यातील अनेक भागात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवून आले. घरातील वस्तू हलू लागल्याने नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी लागलीच घराबाहेर धाव घेतली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, अनेक गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसले असून काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मेळघाटचा काही भाग, आमझरी, सातपुड्याच्या पायथ्याचा भाग, चिखलदरा, धारणी तालुक्यातील अनेक भागांत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नसली, तरी अनेक गावांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
नागरिकांनी साधला जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क!
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव सुर्जी परीसरात आज (३० सप्टेंबर) दुपारी १.०० ते १.२० च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, या घटनेनंतर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सदर भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात अमझरी व टेटु या गावाच्या दरम्यान आहे. रिश्टर स्केलवर याची नोंद ४.२ इतकी नोंदवली गेली आहे.
कोणत्याही प्रकारची हानी नाही!
दरम्यान अमरावती जिल्ह्यात जमविलेल्या भूकंपाचा धक्का हा सौम्य असल्याने यामुळे कुठल्याही प्रकारची वित्त किंवा जीवित हानी झालेली नाही. दरम्यान चिखलदरा, धारणी, परतवाडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्या झटके जाणवले असल्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
अचलपूरपासून ४०० मीटरवर केंद्र!
भूकंपाचा सर्वाधिक हादरा हा अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांना बसला. भूकंपाचे केंद्र हे अचलपूर पासून ४०० मीटर अंतरावर असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान भूकंपाचे धक्के बसल्यामुळे अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, धारणी या चारही तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.