Govt Scheme : केंद्र सरकारकडून तरुणांसाठी आनंदाची बातमी; दर महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, वाचा नेमकी योजना काय?

केंद्र सरकार तरुणांसाठी लवकरच नवीन इंटर्नशिप योजना सुरू करणार आहे. या योजनेंतर्गत तरुणांना दरमहा ५ हजार रुपये मिळणार आहेत. यापैकी ५०० रुपये कंपन्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधीतून आणि ४,५०० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. या योजनेचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला असून आता या योजनेच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे.

दरम्यान, बजट २०२४ मध्ये केंद्र सरकारने अंतर्वासिता योजना (Internship Scheme) प्रस्तावित केली होती. आता योजनेची अंमलबजावणीची जोरदार तयारी सुरू आहे. माहितीनुसार, राज्य सरकार कॉर्पोरेट मंत्रालयातंर्गत लवकरच इंटर्नशिप योजना सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे.

योजनेचा फायदा कसा घ्यावा?

योजनेचा फायदा घेण्यासाठी तरुणांकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. या योजनेचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराचे वय २१-२४ या वयोगटातील असावे. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. नियमित पदवी शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना इंटर्नशिपचा फायदा मिळणार नाही. त्यांना ऑनलाईन कोर्स वा व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये सहभागी होता येणार नाही.

योजनेतंर्गत काय मिळतील लाभ?

या योजनेत तरूणांना कॉर्पोरेट जगताच्या गरजांनुसार, कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत करण्यात येणार आहे. या योजनेत बड्या कंपन्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतील. कंपन्या या तरुणांना प्रशिक्षण देतील आणि योग्य तरुणांना गुणवत्तेनुसार नोकरी देतील. या तरुणांना विद्यावेतन पण देण्यात येईल. त्यांना दरमहा ५ हजार रुपये वेतन देण्यात येईल. हा पैसा त्यांना सीएसआर फंडातून देण्यात येईल. लवकरच ही योजना सरकार सुरू करणार आहे. त्यासाठीचे पोर्टल पण पुढील महिन्यात सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.