नवी दिल्ली : बँकेत खाते उघडणे असो किंवा एखादा आर्थिक व्यवहार करायचा असो, अशावेळी पॅन, आधार कार्ड क्रमांक लागतोच, त्यामुळे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची कागदपत्र ठरत आहेत. तसेच ही कागदपत्रे जपून ठेवणेसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. पण आज आधार कार्ड, पॅन कार्डसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे की, आधार आणि पॅन कार्ड (Aadhaar and PAN card) लीक करणाऱ्या दोन वेबसाइटची नावे नुकतीच समोर आली आहेत.
दरम्यान, सरकारकडून अशा वेबसाइट ब्लॉक करण्याची कारवाई भारतातील नागरिकांच्या गोपनियतेचे संरक्षण करण्यासाठी आणि सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांना बळ देण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे. कारण – डिजिटल जग सतत विकसित होत असताना, व्यक्ती आणि संस्थांनी डेटा सुरक्षेला प्राधान्य देणे आणि संभाव्य धोक्यांविरुद्ध जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे.
सुरक्षित इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध!
सुरक्षित इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. काही वेबसाइट्स देशातील नागरिकांचा आधार आणि पॅन कार्ड डेटा लीक करत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली असून सरकार सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देते. या संदर्भात या वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्यात असे समजते.
काही वेबसाइट्समध्ये महत्त्वपूर्ण सुरक्षा!
vulnerabilities म्हणजेच कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा नेटवर्कमध्ये अशा गोष्टी आढळणे, जे हॅकर्स किंवा अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यास अनुमती देऊ शकतात. त्यामुळे मेईटीच्या (Meity) निदर्शनास आले आहे की, काही वेबसाइट भारतीय नागरिकांच्या आधार आणि पॅन कार्डसह (Aadhaar and PAN card) वैयक्तिक माहिती लीक करत आहेत. त्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. डेटा लीकच्या या घटनेने लोकांची चिंता वाढली आहे.
भारतीय टेलिकॉम युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर!
७५ कोटी भारतीय टेलिकॉम युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना या प्रणालीचे ऑडिट करण्यास सांगितले होते. यामागे हॅकर्सकडे युजर्सचे फोन नंबर आणि आधार कार्ड यांसारख्या डिटेल्स असल्याचे समोर आले आहे.
सायबर सुरक्षा फर्म दावा काय?
CloudSEK (सायबर सुरक्षा फर्म) ने दावा केला होता की, हॅकर्सच्या एका गटाने भारतीय मोबाइल नेटवर्क ग्राहकांचा एक मोठा डेटाबेस विक्रीसाठी डार्क वेबवर ठेवला होता. त्यासाठी ते ३ हजार डॉलर्सची मागणी करत आहेत. डेटासेटमध्ये ८५ टक्के भारतीय युजर्सचा डेटा असू शकतो.
डेटा लीक करणाऱ्या वेबसाइटचे नाव!
“इंडियन एरोस्पेस अँड इंजिनिअरिंग” सारख्या वेबसाइट, नवी मुंबईस्थित संस्था, जी विमान देखभालवर लक्ष केंद्रित करते, जी २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आधार डेटा लीक करणाऱ्या वेबसाइट्सपैकी एक होती. त्याचप्रमाणे स्टार किड्झ, मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणारा एक ई-प्लॅटफॉर्मदेखील २५ सप्टेंबरपर्यंत आधार कार्डची माहिती लीक करत होता. तसेच ही संबंधित URL आता ब्लॉक करण्यात आली आहे.