आज २८ सप्टेंबर शनिवार असून इंदिरा एकादशी आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचे श्राद्ध केले जाईल. सिद्ध योग आणि आश्लेषा नक्षत्राचा संयोग जुळून आला आहे. चला तर मग मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशिंसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशिभविष्यातून.
मेष : आज तुम्हाला नवीन लोक भेटण्याची शक्यता. ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आईच्या बाजूने आर्थिक लाभ होण्याची शक्यता. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा. नोकरीत वातावरण चांगले असेल ज्यामुळे काम करणे सोपे होईल, मालमत्तेत गुंतवणूक करताना भावाचा सल्ला घ्या.
वृषभ : आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला सर्वतोपरी त्रास दिला जाईल. आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यासाठी सावध राहा. कामाच्या ठिकाणी हानिकारक परिस्थिती असेल. कोणतेही काम इतरांवर सोडू नका. प्रेम जीवनात गोडवा राहण्याची शक्यता. कुटुंबात तणावाचे वातावरण असू शकते, राग टाळावा लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. नात्यात दूरावा येऊ शकतो.
मिथुन : आज तुम्हाला व्यवसायानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. ज्यातून फायदा होऊ शकतो. पैशाची जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कोणाच्या बोलण्यामुळे तुमचे काम थांबवू नका. अन्यथा तुमची प्रगती थांबेल. व्यवसायात लाभाची परिस्थिती निर्माण होईल. मुलांना चांगले काम करताना पाहून आनंदी असाल.
कर्क : विवाहयोग्य लोकांसाठी चांगल्या संधी येतील. सामाजिक सेवांशी संबंधित चांगले यश मिळण्याची शक्यता. तुमची आज प्रगती होणार आहे. कौटुंबिक व्यवसायात प्रगतीसाठी वडिलांचे मार्गदर्शन मिळू शकेल. घरातील वातावरण शांत राहिल. व्यापारी वर्गाला व्यवसायात नवीन उत्पादनांता समावेश करावा लागेल. परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कुणाकडून पैसे उधार देताना विचार करा.
सिंह : व्यवसायात तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकेल. ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. व्यस्त जीवनशैलीतून कुटुंबासाठी वेळ काढा. भांवडांसोबत चांगला वेळ जाईल. कला शाखेत नवीन संधी मिळतील. कामातील सहकार्यामुळे तुम्हाला लाभ होण्याची शक्यता. चुका झाल्यावर माफी मागा.
कन्या : आज तुमच्या आळशीपणामुळे व्यवसायात नुकसान होईल. लाभ मिळताना निराशा होऊ शकते . मित्र आणि कुटुंबासाठी चिंतेत असाल. काम सोडून इतरांच्या फालतू गोष्टी ऐकू नका. मौल्यवान वेळ वाया घालवाल. व्यवसायात कमी नफा मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
तूळ : व्यवसायात इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुमची परिस्थिती लक्षात घेऊन काम करावे लागेल. तुम्हाला तरच यश मिळेल. तब्येतीत चढ-उतार असतील. डोळे आणि पाठीचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत देवदर्शनाला जाण्याचा मार्ग येऊ शकतो.
वृश्चिक: आज तुमच्यात आळस संचारेल. दैनंदिन कामे संथ गतीने कराल. रखडलेली कामे आज पूर्ण करण्याचा विचार करा. कार्यक्षेत्रावर जास्त लक्ष देणार नाही. तुमची आर्थिक स्थिती ढासळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मुलाचे लग्न जुळू शकते.
धनु : आज चांगली बातमी ऐकू येऊ शकते. अडकलेले पैसे आज मिळण्याची शक्यता. संध्याकाळी मनोरंजनात वेळ घालवा. घरात कोणाशीही वाद घालू नका. नात्यात दूरावा येऊ शकतो. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. पैसे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होऊ शकतील. मित्राच्या मदतीने पुढे जा.
मकर : आज राजकारणातील लोकांचा प्रभाव वाढेल. जोडीदाराला काही भेटवस्तू द्याल. तुमचे आरोग्य सुधारेल. तुमची चिडचिड वाढू शकते. तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायातील अडथळे दूर होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुन्या कर्जातून सुटका होईल.
कुंभ : एखाद्यासोबत वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नात्यात दूरावा येईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबाच्या सुख- समृद्धीसाठी पैसे खर्च कराल. लव्ह लाईफमध्ये आदर वाढण्याची शक्यता. पार्टनरशीपमध्ये गुंतवणूक करण्यास आजचा दिवस चांगला असेल.
मीन : आज मोठ्यांच्या मदतीने काम पूर्ण होईल. जोडीदाराची साथ मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. तुम्हाला मानसिक शांती मिळण्याची शक्यता. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी दिवस चांगला जाईल. सर्वत्र तुमची कीर्ती पसरेल.