एनिमिया (Anemia) म्हणजेच रक्ताची कमतरता. ही महिलांमध्ये उद्भवणारी एक कॉमन समस्या आहे. जास्तीत जास्त महिला या समस्येतून जात असतात ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांना अनेक गंभीर आजारही उद्भवतात. शरीरातील पेशींना जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. (Food For Hemoglobin) ऑक्सिजन शरीरातील लाल रक्तपेशींमध्ये असलेले हिमोग्लोबिन पोहोचवते.
शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा हिमोग्लोबीन आणि रेड ब्लड सेल्स तयार होण्याच्या प्रक्रियेवर परीणाम होतो. यामुळे पेशींना व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे संपूर्ण शरीराच्या कार्यावर, मेंदूवरही याचा परीणाम होतो. त्यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी ५ पदार्थांचा आहारात समावेश करा. ज्याने नक्कीच फायदा होईल.
विशेष म्हणजे महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांना मासिक पाळी येत आहे किंवा ज्या महिला रजोनिवृत्तीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्या महिलांना ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. लोहाच्या कमतरतेवर काही महिला मेडिसिन सुरु करतात. पण याव्यतिरिक्त आपण आहारातूनही आयर्न मिळवू शकता. त्यानुसार, चला जाणून घेऊया कोणत्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात लोह आढळते.
१) पालक
लोहाची कमतरता जाणवल्यास आहारात पालकाचा समावेश करा. हे ॲनिमियावर उपचार करण्यास मदत करते. पालक हे व्हिटॅमिन सी आणि फोलेटचा उत्तम स्त्रोत आहे. जे लाल रक्तपेशी तयार करण्यासही मदत करते.
२) बीटरूट
बीटरूट हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. यात लोहाचे प्रमाण जास्त असतेच, पण त्यात पोटॅशियम आणि फायबर तसेच फॉलिक ॲसिड देखील असते. यासाठी बीटरूटचा रस प्या किंवा त्याच्या पानांपासून भाजी तयार करून खा.
३) खजूर
खजुरामध्येही लोहाचे प्रमाण जास्त असते. यात लोह, मॅग्नेशियम, तांबे, जीवनसत्त्व हे पोषक घटक असते. आपण दिवसभरात दोन-तीन खजूर खाऊ शकता. यामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि लोहाची पातळीही वाढते.
४) दुधी भोपळा
अशक्तपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी दुधी भोपळा बेस्ट आहे. दुधी भोपळ्याचा रस किंवा भाजी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यात लोह आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.
५) रताळे
रताळ्याच्या अर्धा कप सर्व्हिंगमध्ये २.५ मिलीग्राम लोह असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आपण रताळे उकळून किंवा विविध पदार्थांमध्ये घालून खाऊ शकता.
टीप: ही बातमी केवळ माहितीकरिता असून, कुठलाही उपाय करण्याआधी डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.