Horoscope today 26 September 2024: गुरुपुष्यामृत योगाचा शुभ संयोग; कुठल्या राशीचे दैनंदिन जीवन राहील चांगले? कामाच्या ठिकाणी कसा असणार दिवस? जाणून घ्या राशिभविष्य!

आज २६ सप्टेंबर गुरुवार आहे. चंद्र कर्कराशीत असून गुरुपुष्यामृत योगाचा शुभ संयोग जुळून येईल. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी असून नवमी श्राद्ध केले जाईल. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया २६ सप्टेंबरचे राशीभविष्य काय सांगतात?

मेष : (Aries) आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज अती विचाराने मनावर ताण येऊ शकतो. मन हळवे होईल. वाद-विवाद होण्याची शक्यता.आप्तेष्टांशी कटुता निर्माण होण्याचे संकेत आहेत. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी निर्माण होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. एखाद्या स्त्रिमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृषभ: (TAURUS): आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. सुरूवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकता. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. धनसंचय होऊ शकेल.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपले शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकता. आर्थिक लाभ झाला तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे जाणवेल. आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहारात सावध रहावे लागेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभण्याची शक्यता.

कर्क (CANCER) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपारनंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक, मानसिक आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता. मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्यास, कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकता.

सिंह (LEO) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होण्याची शक्यता. कुटुंबियांशी कटुता निर्माण होऊ शकते. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकता. आरोग्यात सुधारणा होईल. खर्च नियंत्रित ठेवावे लागू शकते.

कन्या (VIRGO) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज सकाळची वेळ आपणास आनंददायी आणि लाभदायी असू शकते. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. दुपारनंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी उदभवतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

तूळ (LIBRA) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता. धनप्राप्ती संभवते. पत्नी आणि संतती संबंधित लाभ होतील. मित्रांच्या सहवासाने आनंद होऊ शकतो.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपारनंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता जाणवू शकते. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होण्याची शक्यता. नोकरी-व्यवसायात अनुकूलता लाभू शकते.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळं बेचैनी वाढेल. नोकरी-व्यवसायात सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. प्रतिस्पर्धी आणि विरोधक ह्यांच्याशी वाद संभवतात. नवीन कार्यारंभात अडचणी निर्माण होण्याची शक्यता. महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास आणि मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य आणि मान-सन्मान संभवतात. दुपारनंतर मात्र शारीरिक, मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होण्याची संभावना. काही ना काही कारणाने संताप वाढू. त्यामुळे कुटुंबीय आणि सहकारी ह्यांचे मन दुखावेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल. दुपारनंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकता.

  1. मीन (PISCES) :आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल असू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता. दुपारनंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणाने आपल्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विरोधकांवर मात करू शकता. तसेच, अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता.