BSNL ने टाकले Jio, Airtel आणि Vi ला मागे; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक!

आजकाल बीएसएनएलबद्दल (BSNL) अनेक चर्चा ऐकायला मिळतात. खरेतर, जेव्हापासून रिलायन्स जिओ, भारतीय एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने जुलै २०२४ मध्ये त्यांच्या संबंधित रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत, तेव्हापासून लोक BSNL बद्दल खूप चर्चा करत आहेत. आता बीएसएनएलने या सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांना आणखी एका प्रकरणात मागे टाकले आहे.

दरम्यान, खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनचे दर ३०% ने वाढवल्यानंतर लोक म्हणू लागले की, आता त्यांच्यासाठी बीएसएनएल हा एकमेव पर्याय उरला आहे. लोक त्यांचा नंबर बीएसएनएलला पोर्ट करण्याबाबत बोलत आहेत. अनेक राज्यांमध्ये, अनेक लोकांनी त्यांचे नंबर BSNL कडे पोर्ट केले आहे आणि बरेच नवीन वापरकर्ते देखील आता BSNL शी जोडले गेले आहे.

बीएसएनएल (BSNl) बनली पहिली पसंती!

माहितीनुसार, महागड्या रिचार्जनंतर, मोठ्या संख्येने मोबाइल वापरकर्त्यांनी जिओला निरोप दिला आणि थेट बीएसएनएलकडे वळले. Jio-airtel आणि Vi च्या महागड्या रिचार्जमुळे मोठ्या संख्येने मोबाईल वापरकर्ते संतप्त झाले असून सध्या ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक बीएसएनएलकडे पोर्ट केले आहेत. तसेच, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे जिचा यूजर बेस जुलैमध्ये अधिक वाढला आहे.

२९ लाख नवीन ग्राहक!

BSNL मध्ये २९ लाख नवीन ग्राहक सामील झाले आहेत. याच काळात मात्र भारतीय एअरटेलचे सुमारे १६.९ लाख वापरकर्ते गमावले. एवढ्या मोठ्या संख्येने मोबाईल वापरकर्त्यांनी एअरटेल नेटवर्क सोडल्याचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. त्याचप्रमाणे व्होडाफोन आयडियाने १४.१ लाख वापरकर्ते गमावले, तर रिलायन्स जिओने ७.५८ हजार मोबाइल वापरकर्ते गमावले आहेत.

या राज्यांमध्ये ग्राहकांची संख्या कमी!

दरवाढीनंतर ईशान्य भारत, महाराष्ट्र, राजस्थान, मुंबई, कोलकाता, तामिळनाडू, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, हरयाणा, आंध्र प्रदेश टेलिकॉम सर्कलमधील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. वायरलाइन किंवा फिक्स्ड लाइन कनेक्शन सेगमेंटमधील ग्राहकांची संख्या जुलैमध्ये सुमारे एका टक्क्याने वाढली, असल्याचे समजते.