देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. BSNL सध्या वेगाने 4G-5G नेटवर्कचे नेटवर्क टाकत आहे. तसेच, सरकारी दूरसंचार कंपनी 5G चाचणी करत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, सध्या BSNL वापरकर्त्यांसाठी लवकरात लवकर 5G नेटवर्क आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. BSNL सध्या अनेक कंपन्यांच्या सहकार्याने 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. जर बीएसएनएलचा हा प्रयोग यशस्वी झाला तर टेलिकॉम क्षेत्रात त्याचा खरोखरच मोठा परिणाम होईल, असे समजते.
BSNL 5G चाचणी सुरू झाली!
BSNL च्या 4G-5G च्या दिशेने वाटचाल केल्याने स्थानिक तांत्रिक उत्पादक आणि पुरवठादरांना त्यांची बाजारपेठेतील स्थिती सुधारण्याची उत्तम संधी मिळाली आहे. कंपनी सध्या लेखा वायरलेस गॅलोर नेटवर्क (Lekha Wireless, Galore Networks) विविडिएन (VVDN Technologies) आणि WiSig सारख्या कंपन्यांसह 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. या कंपन्यांसह बीएसएनएल भारताचे स्वदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओचे स्वतःचे 5G नेटवर्क आहे. पण इतर 5G नेटवर्कसाठी परदेशी कंपन्यांची मदत घ्यावी लागेल. एका अहवालानुसार, BSNL सध्या दिल्लीच्या मिंटो रोडवर लेखा वायरलेसच्या सहकार्याने 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. VVDN ने चाणक्यपुरीमध्ये 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली असल्याचे समजते.
BSNL ची 4G नेटवर्क सेवा, २२५०० टॉवर उभारेल!
माहितीनुसार, लवकरच देशात बीएसएनएलची 4G सेवा सुरू होणार आहे. यातून 4G कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. बीएसएनएल ग्राहकांना हा नेटवर्क मिळावा यासाठी निगम कडून वेगाने काम केले जात आहे. 4G नेटवर्क साठी देशात बीएसएनएल कडून तब्बल २२५०० मोबाईल नेटवर्क टॉवर उभारण्यात आले आहे, हा आकडा लवकरच एका लाखावर पोहोचेल, सोबतच देशाचा १० टक्के वाटा 6G पेटंट मध्ये असेल. बीएसएनएलचे टार्गेट फक्त टेक्नॉलॉजी आयात करणे नसून ही सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्क येथे सक्रिय राहावा यावर लक्ष केंद्रित करीत आहे.