आता आधार कार्ड करता येणार ‘या’ तारखेपर्यंत अपडेट; कसे कराल? नेमके शुल्क किती? वाचा संपूर्ण बातमी!

केंद्र सरकारने मोफत आधार अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. याआधीही तीन महिन्यांसाठी मुदत वाढवण्यात आली होती. त्यानंतर आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख आज १४ सप्टेंबर होती, मात्र सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला असून, याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होणार असल्याचे समजते.

दरम्यान, आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत यूआयडीएआयने वाढवली आहे. आता हे काम १४ डिसेंबर २०२४ पर्यंत मोफत करता येणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने १० वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा काल संपणार होती. मात्र यामध्ये आता वाढ करण्यात आली असून,आता अनेक लोकांना या बातमीमुळे दिलासा मिळाला आहे.

अंतिम तारीख अनेकवेळा वाढवण्यात आली!

यापूर्वीही हे काम मोफत करून घेण्याची अंतिम तारीख अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. प्रथम ती १४ मार्च ते १४ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती. नंतर ही अंतिम तारीख पुन्हा एकदा १४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. शनिवारी त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. आता आधार कार्ड वापरकर्ते हे काम १४ डिसेंबरपर्यंत पूर्णपणे मोफत करू शकतात. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीनंतर हे जास्त शुल्क आकारले जाईल असे अनेकांना भीती असते, परंतु ही सेवा संपूर्णपणे मोफत असून UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.

ऑनलाइन आधार कसे कराल अपडेट?

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर लॉग इन करा. होमपेजवरील My Aadhaar पोर्टलवर जा आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP वापरून लॉग इन करा. यानंतर, तुमचे तपशील तपासा आणि तपशील बरोबर असल्यास, योग्य बॉक्सवर खूण करा. लोकसंख्याशास्त्रीय माहिती चुकीची आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडा. दस्तऐवज अपलोड करा. दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF स्वरूपात अपलोड करा.

मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा फक्त ऑनलाइन करता येणार!

मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे. आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी, तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन विहित शुल्क भरावे लागणार नाही. दरम्यान, लक्षात ठेवा की काही अपडेट्स आहेत जे ऑनलाइन नसून केंद्रावर जाऊन करावे लागतील. यामध्ये तुम्हाला आयरिस किंवा बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असल्यास. मग यासाठी तुम्हाला आधार केंद्रात जावे लागू शकते.