Horoscope today 13 September 2024: आज तीन नक्षत्राचा शुभ संयोग; बघा काय लिहिलंय तुमच्या नशिबात? जाणून घ्या राशिभविष्यातून!

आज १३ सप्टेंबर शुक्रवार असून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. आज सौभाग्य योग, शोभन योग आणि पूर्वाषाढा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला असल्यामुळे कुणाचा दिवस असणार शुभ? जाणून घ्या राशिभविष्यातून!

मेष : आज तुमच्या अनियंत्रित कृतीमुळे आजूबाजूचे वातावरण बिघडण्याची शक्यता. स्वत:ला हुशार समजू नका. कार्यक्षेत्रात अनेक संधी येऊ शकतील, मात्र मर्यादेत काम करावे लागेल. कुटुंबात काही सदस्यांची उणिव भासेल. तुमच्या चुकीमुळे आरोग्य बिघडू शकते.

वृषभ : आज परिस्थिती गोंधळाची असू शकते. दिवसाच्या सुरुवातीला थोडी भीती असल्यामुळे नकारात्मक विचार मनात येऊ शकतील. नोकरी- व्यवसायात स्थिरता राहणार नाही. अनोळखी व्यक्तीच्या मदतीने आर्थिक प्रश्न सोडवू शकाल.

मिथुन : आज तुम्ही इतरांना सल्ला द्या. तुमची सार्वजनिक क्षेत्रात प्रतिभा वाढू शकते. दुपारनंतर कष्टाच्या प्रमाणात अधिक लाभ मिळण्याची शक्यता. तुमचा नफा कुणीही हिसकावून घेणार नाही याकडे लक्ष द्या. खर्च वाढू शकतो. तसेच आज धार्मिक कार्यात रुची वाढू शकते.

कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहिल. काही विपरित परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. नातेवाईकांचे ऐकावे लागू शकते. आर्थिक समस्या कमी होण्याची शक्यता. व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी काम करा. पैशांच्या बाबतीत घाई करु नका. आज पैसे अधिक खर्च होऊ शकतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कठोर शब्दांनी इतरांना दुखवू नका. आरोग्य सामान्य राहिल.

सिंह : आजचा दिवस लाभाचा ठरू शकतो. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याने तुम्ही उत्साही असाल. कामासाठी कमी वेळ द्या. सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागू शकते. छोटे-मोठे खर्च देखील होतील. अचानक काम खोळंबल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्रांसोबत वेळ घालवा.

कन्या : आज तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील अशी शक्यता. व्यवसायात फायदा होण्याची देखील शक्यता आहे. जास्त खर्चामुळे काही महत्त्वाचे काम रद्द करावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळे मानसिक शांतता राहिल. मित्रांकडून सहकार्य मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्यांशी भावनिक संबंध निर्माण होतील.

तूळ : आजच्या दिवसाची सुरुवात विशेष योजनांनी होईल. ज्यात तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन फायदेशीर करार होण्याची संभावना. अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतील. आजचा दिवस भाग्याचा असेल. वागणुकीच्या आधारावर तुम्ही इतरांपेक्षा जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक: आज तुम्हाला कोणतेही काम लवकर करता येणार नाही. तुम्ही कामात अधिक व्यस्त असाल. नोकरी आणि व्यवसायाची स्थिती सामान्य राहिल. खर्चाच्या वाढीमुळे थोडी चिंता असू शकते. मानसिक संतुलन चांगले राहिल. काही कामांतून पैसा मिळण्याची शक्यता. अचानक लाभ देखील होण्याची शक्यता आहे.

धनु : आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. दिवसाच्या सुरुवातीपासून घरगुती वातावरण सुधारण्याचा प्रयत्न करा. तुमचे वागणे उद्धट राहिल. तुम्हाला बाहेरुन सहानभूती दाखवावी लागू शकते. तुमच्यात मत्सराची भावना राहू शकते. घरातील शांततापूर्ण वातावरण भंग होण्याची शक्यता आहे. मानसिक दडपण वाढू शकते.

मकर : आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. काही परिस्थितीमुळे राग येईल. वाद होण्याची शक्यता तुम्हाला अस्वस्थ करेल. कामाच्या व्यवसायातून नफा मिळू शकतो. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची कमतरता भासू शकते. कामात समाधानी राहाल. आर्थिक लाभाच्या घाईघाईनंतर खर्चाची शक्यता राहिल.

कुंभ : आज तुमच्या मनाची द्विधा परिस्थिती राहिल. बाहेर पडण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. कामाच्या व्यवसायातून फायदा होईल. दुपारनंतर तुमचा आळस वाढू शकतो. घरातील कामे वेळेवर पूर्ण करा, अन्यथा मतभेद होण्याची शक्यता. व्यापारीवर्गामुळे प्रगती होईल. कार्यक्षेत्रात कोणतेही बदल टाळा. कौटुंबिक वातावरण आज बदलेल असेल.

मीन : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. दिवसाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. घरामध्ये काही विशेष कामाबद्दल अडचणी निर्माण होऊ शकतील. व्यवसाय कार्यक्षेत्रात समाधानकारक असाल. आर्थिक समृद्धी आणि खर्चात वाढ होण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी तुम्हाला तडजोड करावी लागू शकते.