आज १२ सप्टेंबर गौरी-गणपती विसर्जन असून गुरुवार आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील नवमी तिथी असून आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि मूळ नक्षत्र असणार आहे. या शुभ संयोगात तुम्ही शुभ कार्य करु शकता, त्यामुळे जाणून घ्या कसे असणार तुमचे आजचे राशिभविष्य.
मेष : आज मानसिक तणाव संपण्याची शक्यता. आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. पैसे दान करा. तसेच, आजचा शुभ रंग पांढरा आहे.
वृषभ : अनावश्यक ताण येऊ शकतो. पैसा खर्च होऊ शकतो. तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या. केळी दान करा. आजचा शुभ रंग निळा आहे.
मिथुन : आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरमधील अडथळे दूर होण्याची शक्यता. छोटा प्रवास होऊ शकतो. देवाला पिवळी फुले अर्पण करा. आजचा शुभ रंग गडद हिरवट पिवळा आहे.
कर्क : आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुम्हाला सन्मान मिळू शकतो. अतिरिक्त काम होईल. पैसे दान करा. आजचा शुभ रंग पिवळा आहे.
सिंह : करिअरमध्ये लाभाची शक्यता आहे. अडकलेला पैसा मिळू शकतो. मुलांकडून प्रगती होईल. अन्नपदार्थ दान करा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे.
कन्या : आज आरोग्याची काळजी घ्या. करिअरमध्ये बेफिकीर राहू नका. नात्यात अडचण येऊ शकते. केळी दान करा. आजचा भाग्यवान रंग पिरोजा म्हणजे हिरवा निळा रंग आहे.
तूळ : छोटा प्रवास होऊ शकतो. समस्या सुधारतील. नवीन कामाबाबत संधी मिळण्याची शक्यता. अन्नपदार्थ दान करा. आजचा शुभ रंग राखडी आहे.
वृश्चिक : प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. पद आणि प्रतिष्ठेत लाभ होण्याची शक्यता. आरोग्याच्या समस्या सुटतील. देवाला पिवळी फुले अर्पण करा. आजचे शुभ रंग नारंगी आहे.
धनु : आज तब्येत सुधारेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील अशी शक्यता. पैसे दान करा. आजचा शुभ रंग पांढरा आहे.
मकर : कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. पैशाचा खर्च वाढू शकतो. दुखापतीपासून स्वतःचे रक्षण करा. फक्त रुपये दान करा. आजचा शुभ रंग आकाशी निळा आहे.
कुंभ : अडकलेले धन प्राप्त होण्याची शक्यता. नातेसंबंध सुधारतील. करिअरमधील समस्या दूर होऊ शकतील. पैसे दान करा. आजचा शुभ रंग निळा आहे.
मीन : पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. करिअरमधील समस्या दूर होण्याची देखील शक्यता. आर्थिक लाभ होईल. देवाला पिवळी फुले अर्पण करा. आजचा शुभ रंग हिरवा आहे.