आज गणेशोत्सवाचा चौथा दिवस आहे. आज गणपतीची आई गौराई माहेरी येणार आहे. कोकणात गौराईचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. तर विदर्भात महालक्ष्म्या बसवल्या जात आहेत. गौरी गणपतीचा सण तुमच्यासाठी कसा असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता असणार आहे, तर बघा कसे असणार तुमचे आजचे भविष्य?
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस चांगला असणार आहे. सामाजिक कार्यात रुची राहणार असून मानसन्मान मिळण्याची शक्यता. व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकतो. काही प्रभावशाली व्यक्तीशी परिचय वाढेल. वाईट लोकांपासून दूर राहा.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस अनुकूल राहील दूरवरून आनंदाची बातमी मिळू शकते. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. खर्च देखील वाढू शकतो. आत्मविश्वास वाढेल. धोकादायक आणि जोखमीची कामे टाळा. आज तुम्हाला मोठे काम केल्यासारखे वाटेल.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस संमिश्र जाईल. नवीन कपडे आणि दागिने खरेदीवर खर्च होऊ शकते. प्रवास मनोरंजक असेल. भावांकडून सहकार्य मिळू शकते. धोकादायक आणि जोखमीची कामे टाळा. घराच्या आत आणि बाहेर आनंदाचे वातावरण असेल.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस संमिश्र जाईल, कौटुंबिक चिंता राहील. प्रवासाची शक्यता आहे व्यवहारात घाई करू नका. आवश्यक वस्तू गहाळ होऊ शकतात. वादाला प्रोत्साहन देऊ नका. बुद्धिमत्तेचा वापर केल्यास नफा वाढेल. थकवा जाणवू शकतो.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज व्यवहारात घाई करू नका. कुटुंबासह मनोरंजक सहलीचे आयोजन केले जाऊ शकते. मित्रांच्या मदतीने कार्य पूर्ण होण्याची शक्यता. नोकरीत वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. काळ अनुकूल असणार आहे. आळस सोडून प्रयत्न करा.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल संभवतो. योजना प्रत्यक्षात येणार आहे. व्यवसायात प्रगतीचा विचार केला जाऊ शकतो. नोकरीत अधिकारी आनंदी राहतील, अशी शक्यता. कौटुंबिक चिंता कायम राहील. व्यवसायात अपेक्षित लाभ होण्याची शक्यता.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस शुभ राहणार आहे. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. सत्संगाचा लाभ मिळेल. कौटुंबिक सहकार्य मिळू शकतो. घरात आणि बाहेर शांतता आणि आनंद राहील. तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि मदत मिळण्याची शक्यता.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस हानी आणि अपघाताने संमिश्र राहणार आहे. बेफिकीर राहू नका. कोणाशी विनाकारण वाद घालू नका. मानसिक त्रास होऊ शकतो. मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा. धोकादायक आणि जोखमीची कामे टाळा.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस संमिश्र असणार असून घाईने काम बिघडेल. बाहेर जाण्याचे बेत आखले जातील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे काम सोपे होण्याची शक्यता. घराच्या आत आणि बाहेर सुख-शांती राहील.
मकर (Capricorn Zodiac)
आजचा दिवस शुभ असणार आहे. घराबाहेर प्रवासाची शक्यता आहे. मोठे सौदे मोठे फायदे मिळू शकतात. तुमचे भाग्य सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. वादाला प्रोत्साहन देऊ नका. वाईट संगत टाळा. धोकादायक आणि जोखमीची कामे टाळा.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कुटुंबात मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. पार्टी किंवा पिकनिक आयोजित करु शकता. तुम्हाला काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते. आज आपण स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेणार आहात.
मीन (Pisces Zodiac)
आजच्या दिवशी तुम्हाला इतरांकडून जास्त अपेक्षा असेल. घाईमुळे कामात अडथळे येतील. व्यवहारात सावधगिरी बाळगा. कामात विलंब होऊ शकतो. चिंता आणि तणाव राहू शकते. मित्रांसोबत वेळ चांगला जाईल.