आलिया भटचा आगामी चित्रपट ‘जिगरा’ ची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे, जो या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात आलिया भट आणि वेदांग रैना पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. आज, रविवारी या चित्रपटाचा धमाकेदार आणि ॲक्शनने भरलेला ट्रेलर रिलीज झाला, ज्याने चाहत्यांमध्ये खळबळ माजवली आहे.
दरम्यान, आलिया भट तिच्या या वर्षातील बहुप्रतिक्षित ‘जिगरा’ या चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, ज्यामध्ये वेदांग रैना तिच्यासोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाच्या आगमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सामान्यतः रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये दिसणारी आलिया या चित्रपटात पहिल्यांदाच एका नव्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया पहिल्यांदाच ॲक्शन अवतारात दिसणार असून हे तिच्या चाहत्यांसाठी खूपच रोमांचक असणार आहे.
आलिया-वेदांगच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज!
वासन बाला यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या ‘जिगरा’ चित्रपटाचा ट्रेलर ॲक्शनने भरलेला आहे. या चित्रपटाची कथा भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित आहे. एक बहीण आपल्या भावाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. पण हा प्रवास त्याच्यासाठी सोपा असणार नाही. ट्रेलरची सुरुवात सत्या (आलिया भट्ट) पासून होते, जो तिच्या आयुष्याबद्दल कोणाशी तरी बोलत आहे. ती म्हणते की देवाने माझी आई काढून घेतली, वडिलांनी आत्महत्या केली आणि दूरच्या नातेवाईकांनी आम्हाला बहिष्कृत केले. त्यानंतर ती म्हणताना दिसते, खूप मोठी कहाणी आहे आणि भावाकडे वेळ फार कमी आहे, असा आलियाचा संवाद सुरुवातीला दिसतो. आलिया ट्रेलरमध्ये आगीशी सामना करताना दिसते, स्वतःची नस कापायच्या तयारीत दिसते, गुंडांशी दोन हात करुन भावाची रक्षा करताना दिसते.
या सिनेमातून वेदांग रैनाने केले पदार्पण!
वेदांग रैनाने आलियाच्या भावाची भूमिका साकारली आहे. वेदांगने झोया अख्तरच्या ‘द आर्चीस’ सिनेमातून पदार्पण केले होते. वेदांग-आलियाच्या भावा-बहिणीची जोडी प्रेक्षकांना कशी वाटणार? हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. तसेच, ११ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असून वसन बाला यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.