गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात वाढ; जाणून घ्या नेमके भाव काय?

अगदी तोंडावर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात वाढ झाली असून यातही लाल फुलांचे दर चांगलेच कडाडले आहेत. श्रावण महिन्यापासून फुलांची मागणी वाढत असली तरी प्रतिकिलोला पन्नास रुपये मिळत असून, पुढील दोन दिवसांत बाजारभाव वाढतील, असे समजते. यात मोगरा, गुलाब, लिली या फुलांनी भाव खाल्ला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फुलांचे भाव वाढले आहेत. पाऊस समाधानकारक झाला असला तरी फुलांचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतातील फुलांच्या मळ्यात फुले चांगली आलेली असून, सध्या या फुलांची तोडणी सुरू आहे. गणपती उत्सवात फुलांना चांगला बाजारभाव मिळत असल्याचे दिसते आहे. तसेच, बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ (Increase demand for flowers) झाली असल्यामुळे याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

गुलछडी सगळ्यात महाग!

बाजारात सध्या गुलछडी सगळ्यात महाग आहे. प्रति किलो गुलछडी खरेदी करण्यासाठी १,४०० रुपये मोजावे लागत आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या पांढऱ्या निशीगंधा म्हणजेच गुलछडी यंदा चांगलाच भाव खाताना दिसत असून मार्केट यार्डमध्ये सुका मेवा पेक्षाही महाग किंमतीने निशीगंधा विकला जात आहे.

असे आहेत हारांचे दर!

– झेंडू हार – १० रुपयांपासून सुरुवात (लहान आकारापासून ते मागणीनुसार)

– लिली – १० रुपयांपासून सुरुवात (लहान आकारापासून ते मागणीनुसार)

– शेवंती – ३० रुपयांपासून सुरुवात (आकारापासून ते मागणीनुसार)

सध्याचा दर काय?

– पिवळा झेंडू २०० रुपये कॅरेट ३०० ते ४०० रुपये दर

– जास्वंद १० रुपये वाटा ५० ते ६० रुपये दर

– लिलीचे फूल १५ रुपये जुडी

– गुलाब ३० रुपये १२ नग ४० ते ६० रुपये जुडी (मागणीनुसार)

– शेवंती १०० रुपये किलो

– दुर्वांची जुडी २ ते ३ रुपये

– ६ ते ७ रुपये जुडी मोगरा २०० ते ३०० रुपये किलो

– ५०० ते ६०० रुपये किलो बेलाची पाने